Thursday, June 14, 2018

पाणी पद्धती

मोकाट पद्धत :-
                    आपण पाणी पद्धतीमध्ये शेतात वरंबे किंवा 

तुषार सिंचन पद्धत:-
 ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.

फायदे:-


१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.
२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.
३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.
४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते
५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.
६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.
७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.
८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.
९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.
१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..
११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.
१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.


ठिबक सिंचन :-
                      म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरतात. ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.या पद्धतीत,जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते. 

ठिबक सिंचनाचे मुख्य फायदे

१. पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते.
२. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते.
३. पिकाला रोजच अगर दिवसाआड अथवा गरजेनुसार पाणी दिले जाते.
४. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो.
५. पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. त्यामुळे ते मुळाच्या सभोवती जिरते. ठिबक सिंचनाच्या या गुणमुळे पिके चांगली जोमाने वाढतात व दर्जेदार पीक उत्पादन मिळते.

No comments:

Post a Comment

मिश्र खते

*   मिश्र  खते *   १ ) १८ : ४६  : ००   कांदा पिक   डोस = १००     :     ५०    :     ५०                     नत्र              स्फुरद...