उद्देश :-
कोंबडी पालन करणे
प्रस्तावना :-
शेतकरी शेती करताना कोंबडी पालनाचा व्यवसाय चालू केला बाजारपेठेची मागणी लक्षात आल्या मुळे तोच व्यवसाय त्याच व्यवसायाकडे लोक व्यवसायिक द्रुष्टीकोनातून पाहू लागले गेल्या १० ते १२ वर्षात लोक कुकुट पालनाकडे वळाले. आज परिस्थिती बदलली . भांडवलाची गुंतवणूक मोठे उत्पन्न मिळवून देणारा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून पहिले जाते .
कुक्कुटपालनाच्या सध्या तीन पद्धती प्रचलीत आहेत:
- अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती
- अर्ध-नियंत्रित पद्धती
- नियंत्रित पद्धती
अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती[संपादन]
सहसा कमी प्रमाणातील कुक्कुटपालन अथवा परसदारी करण्यात येणारे कुक्कुटपालन या पद्धतीने केले जाते.यास अत्यल्प खर्च येतो पण याचे फायदे-तोटेही आहेत.
यासाठी खाद्याचा खर्च अत्यल्प अथवा नगण्य येतो. कोंबड्या ह्या गावात अथवा क्षेत्रात मोकाट फिरून आपले खाद्य प्राप्त करतात.
घार,
मुंगूस,
कुत्रा,
मांजर आदी प्राणी कोंबड्यांची शिकार करतात त्यामुळे व चोरीमुळे आर्थिक नुकसान होते.

पिंजऱ्यात अंडे देणाऱ्या कोंबड्या

कुक्कुटपालन केंद्रात 'ब्रायलर'
भारतात कोंबडी (कुक्कुट) संशोधनात कार्यरत संस्थांनी बहुपयोगी अशा कोंबड्यांच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत

कडकनाथ प्रजातीचा कोबंडा व कोंबडी
कडकनाथ ही
कोंबड्याची एक प्रजाती आहे. या जातीचे स्थानिक नांव "कालामासी" असे आहे, ज्याचा अर्थ
काळे मांस असलेली कोंबडी. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे
रक्त आणि
मांसही काळे असते.
[१] मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि
राजस्थान तसेच
गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते.
आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि
दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो.
[२][३]
- एक दिवसाच्या पिलांचा रंग निळसर ते काळा असतो आणि पाठीवर अनियमित गडद पट्टे असतात.
- या जातीचे मांस काळे असले आणि पाहायला अयोग्य वाटले तरी ते चविष्ट त्याचबरोबर औषधी असल्याचे मानले जाते.
- आदिवासी लोक कडकनाथचे रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांमध्ये वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.
- मांस आणि अंडी प्रथिने (मांसामध्ये २५.४७ टक्के)
- वार्षिक अंडी उत्पादन (संख्या) १०५
गावठी कोंबडीपालन
गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांना जपावे. पिल्ले आकाराने व वजनाने कमी (25 ते 27 ग्रॅम) असतील, तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये. नाही तर पिल्लांमध्ये मरतूक होते. खासकरून नदीप्रवाहाच्या जवळचा भाग किंवा जास्त थंड हवेच्या ठिकाणी वीजकपातीच्या कालावधीमध्ये मरतुकीचे प्रमाण 50 टक्के अधिक असते. शेतकरी यावर उपाय म्हणून पेट्रोमॅक्सच्या साह्याने उष्णता देण्याचा प्रयत्न करतात; परंतु एकंदरीत सर्व विचार केला तरी 10 ते 15 टक्के मर पिल्लांमध्ये निश्चितच धरावी लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कोंबड्या बंदिस्त पद्धतीने पाळताना, त्यांना देण्यात येणारी जागा, खाद्य, पाणी अपुरे पडल्यास कोंबड्यांमध्ये मूलतः असलेल्या विकृतीला चालना मिळते.
शेडमध्ये प्रखर प्रकाश किंवा कोंबड्यांची गर्दी जास्त असल्यास कोंबड्या एकमेकांची पिसे उपटतात. काही वेळा एकमेकांना घायाळही करतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पिल्ले 10 ते 12 दिवसांची असताना एकदा व त्यानंतर एक ते दीड महिने वयाच्या कालावधीत चोची बोथट करणे आवश्यक आहे. असे केल्यास, बोचण्याचे प्रमाण कमी होते. कोंबडीघरात वायुविजन चांगले असणे आवश्यक आहे. वाढीच्या कालावधीत प्रखर उजेड येणार नाही, खाद्याची भांडी बराच काळ रिकामी राहणार नाहीत याची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन असल्यास या विकृतीवर पूर्णपणे मात करता येते. या प्रमाणात कोंबड्या पाळताना गॅस ब्रुडरचा वापर करणे व्यापारी तत्त्वावर अधिक योग्य होईल.
ब्रॉयलर कोंबडीपालनाबाबत माहिती :-
कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. पक्षिघरासाठी जागेची निवड करताना परिसरात नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी. जमीन मुरमाड असावी. जागा शहरात अथवा भरवस्तीत नसावी. पाण्याची व विजेची सोय असावी.
पक्षिघरांसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. पक्षिघराची दिशा ही नेहमी पूर्व - पश्चिम असावी. पक्षिघर उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून घर उभारावे. सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ.फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फूट जागा मिळेल अशाप्रकारे घर उभारावे. उदा. 1000 ब्रॉयलर पक्ष्यांसाठी 1000 चौ.फूट जागा मिळेल अशी घरबांधणी करावी.
पक्षिघराची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो. घराचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो.
घराची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी. जुने पक्षी गेल्यानंतर शेड धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते.
घरांना रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. घराच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी. घरांना लांबीच्या दोन्ही बाजूंस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने ओव्हरहॅग पक्षिगृहात येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही.
घराची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते. घराच्या छपराकरिता वापरण्यात येणारा पत्रा हा सिमेंटचा असावा.
कोंबडीपालनासाठी घराची रचना
कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. कोंबडीघरामध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जमीन मुरमाड असावी. पक्षिघरांसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. पक्षिघराची दिशा ही नेहमी पूर्व - पश्चिम असावी. पक्षिघर उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून घर उभारावे. सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ. फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फटू जागा मिळेल अशाप्रकारे घर उभारावे. पक्षिघराची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो. घराचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो. घराची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी. जुने पक्षी गेल्यानंतर ती धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते.
घरांना रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. घराच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी. घरांना लांबीच्या दोन्ही बाजूस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने ओव्हरहॅग पक्षिगृहात येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. घराची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते.
ब्रुडर न्यूमोनिया
पिलांना हा रोग बुरशीमुळे होतो. विशेषतः पावसाळ्यात व आर्द्रता जास्त असलेल्या हवामानात ही बुरशी पक्ष्याच्या शरीरात दूषित हवा, खाद्य, पाणी यांमधून प्रवेश करते.
लक्षणे
श्वासोच्छ्वासास त्रास, जलद श्वसन, खाद्य नकोसे वाटल्यास पिलाचा मृत्यू चोवीस तासांत होतो.
उपाय
शेडची स्वच्छता ठेवावी. स्वच्छ कोरडे खाद्य द्यावे. पिलांना योग्य जागा व स्वच्छ हवा मिळवून मिळावी. लिटर कोरडे ठेवावे. लिव्हर टॉनिक दिल्यास सुधारण्यास मदत होते.
ऍफ्लोटॉक्सिकॉसिस
ऍस्परगिलस फ्लाक्स नावाच्या बुरशीपासून तयार झालेले विषारी द्रावण कोंबड्यांच्या खाण्यात आल्यास हा रोग होतो. भिजलेले अगर खराब झालेले खाद्यपदार्थ उदा. - शेंगदाणा पेंड, मका, किडलेला गहू वगैरे धान्यांवर बुरशी तयार होते. असे बुरशीयुक्त खाद्य कोंबडीने खाल्ल्यास तिला विषबाधा होते.
लक्षणे
पिले मलूल होतात, त्यांची पिसे विस्कटतात, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते, वाढ खुंटते, पिले पांगळी होऊन जातात.
उपाय
खराब धान्य खाद्यात वापरू नये, धान्य दमट असल्यास त्यांना कडक उन्हात सुकवावे. संशय आल्यास खाद्य बदलावे व पूरक औषधी म्हणून लिव्हर टॉनिक, जीवनसत्त्वे द्यावीत.
No comments:
Post a Comment