Monday, June 11, 2018

ऊस पिकाला सरीवरंबा, कट वाफे पद्धत, सरी नागमोडी पद्धत सुधारित लांब सरी पद्धत, जोडओळ पट्टा पद्धत, एकसरी पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन – रेनगन तुषार सिंचन पद्धत इ.  पद्धतीन पाणी दिलं जात.

कालावधी

उसाच्या पिकाला उस उगवेपर्यंत म्हणजे पहिला १.५ महिना १/३ सरी भिजेल एव्हढं, फुट्व्याचा कालावधी १.५ ते ३ महिने अर्धी सरी भिजेल एवढ, कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे ३ ते १० महिने पाऊन सरी भिजेल एवढं आणि पक्वतेचा कालावधी म्हणजे १० महिने ते ऊस तुटेपर्यंत पूर्ण सरी भिजेल एवढं पाणी द्यावं.  हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागणीपासून तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातलं अंतर कमी जास्त कराव.

योग्य पद्धत

पारंपारिक सरी, कटपध्दत, सरी वरंबा नागमोडी पद्धतीने पाणी देण्यात कोणताच फायदा होत नाही.उत्पादन कमी येत, जमिनी नापीक बनतात, पाणी जास्त लागत, म्हणून पारंपारिक सिंचनाच्या पद्धती बदलून लाम्ब सरी पधतीन पाणी द्यावं.  त्याचे अनेक फायदे होतात.  रानबांधणीच्या खर्चात बचत, लागवडी खालचं क्षेत्र वाढत, पाणी कमी लागत.  हवा – पाणी + अन्नद्रव्याच योग्य संतुलन होत.  अंतर मशागत सुलभ आणि कमी खर्चात होते.  असे अनेक फायदे होतात.
पट्टा पद्धत ठिबक सिंचनासाठी जास्त उपयुक्त ठरते. तसंच पाटपाण्यासाठी सुद्धा.  कारण पहिले ४ महिने ८०% क्षेत्रावर पाण्याचा वापर, तर मोठ्या बांधणीनंतर ४०% क्षेत्रावरच पाण्याचा वापर होतो.  १५ ते २०% पाणी कमी लागते.  पट्ट्यात आच्छादन केल्यास आणखी पाणी वापर कमी होतो.  शिवाय पट्टा पद्धतीचे जे काही इतर फायदे  आहेत ते मिळताताच.
एका सरीत पाणी तर दुसरी सरी रिकामी अशा पद्धतीने एक सरी पट्टा पद्धतीने उसाच्या सरीला पाणी दिल असता १५ ते २०% पाणी कमी लागते.  रिकाम्या सरीला पट्टा पद्धतीप्रमाणे अंतर पिल घेता येते.  पाचटाचं आच्छादन करता येत.  उत्पादन कमी पाण्यात जास्त मिळत.
पट्टा पद्धतीने उसाची लागण करून ठिबक – सिंचन द्वारे पाणी देता येते.  गरजेइतकंच मुळाजवळ पाणी दिल्याने पाण्यात ४० ते ५०% बचत होते आणि उत्पादनात २५ ते ३०% वाढ होते.  याशिवाय द्रवरूप खत ठिबक सिंचनातून दिल्यास खतमात्रेत ३०% बचत होते.  उत्पादन मात्र वाढीव मिळत.  पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्याने जमीन नापीक होत नाही.  फक्त गरज असते ठिबक – सिंचन सुरळीत चालण्यासाठी वेळच्यावेळी योग्य ती निगा राखण्याची.
शक्यतो ऊस पिकाला ऊस मोठा झाल्यानंतर साधी तुषार सिंचन पद्धत तितकीशी फायद्याची नाही.  पण रेनगन तुषार सिंचन पद्धत फायद्याची ठरली आहे.  १ अगर २ रेनगनमध्ये संपूर्ण शेत भिजवता येते.  गरजेइतक पाणी देता येत असल्यामुळे पाण्याच अनावश्यक अपव्यय टाळता येतो.  पाचटाचे आच्छादन केल असल्यास पाचाट लवकर कुजते.  ठिबकपेक्षा खर्च कमी. विद्राव्य खतं देता येतात.  ऊस पावसाच्या पाण्यासारखा धुतला जात असल्यानं किडी – रोग कमी येतात.

सुरुसाठी २५०, पूर्व हंगामासाठी २७५ आणि आडसालीसाठी ३५० हेक्टर  से. मी.  पाण्याची गरज असते.  हवामान – जमीनीचा प्रकार, जमिनीची खोली, पिकाच वय इ.  वर पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवावे.  पाणी मोजण्यासाठी  कटथ्रोट’ फ्लूम या पाणी मोजण्याचा साधनाचा वापर करावा.

ठिबक सिंचनाचे फायदे

  • ऊस पिकास त्याच्या आवश्‍यकतेनुसार हवे तेवढेच पाणी मुळांशी देणे शक्‍य होईल.
  • प्रवाही सिंचन पद्धतीशी तुलना करता ठिबक सिंचनामुळे 50 टक्के ते 55 टक्के पाण्याची बचत होईल. उपलब्ध पाण्यात ठिबकद्वारे दुप्पट क्षेत्र सिंचित करणे शक्‍य होईल.
  • उसाच्या मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीत संतुलित राखले गेल्याने ऊस उत्पादकता 30 टक्के ते 35 टक्के वाढेल.
  • नत्र व पालाशसाठी अनुक्रमे युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आणि स्फुरदासाठी फॉस्फरीक आम्लाचा वापर ठिबकद्वारे मुळांच्या कार्यक्षेत्रात करता येतो, त्यामुळे खतमात्रेत 30 टक्के बचत होईल.
  • तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तणनाशकांचा/ खुरपणीचा खर्च वाचेल.
  • जमीन सपाटीकरणाची आवश्‍यकता भासणार नाही, त्याचप्रमाणे रान बांधणीचाही खर्च वाचेल.

ऊस शेतीत ठिबक सिंचन आणि सरी-वरंबा पद्धतीच्या तौलनिक अभ्यासाचे निष्कर्ष

तपशील ---- सरी- वरंबा पद्धत ---- पृष्ठभागावरील ठिबक सिंचन पद्धत ---- पृष्ठभागांतर्गत ठिबक सिंचन पद्धत ---- ठिबक सिंचन वापरल्याचे फायदे 
उसासाठी एकूण देण्यात आलेले पाणी (हे. सें.मी.) ---- 240 ते 300 ---- 130 ते 150 ---- 110 ते 120 ---- पाण्यात बचत - 50 टक्के ते 55 टक्के 
ऊस उत्पादन (टन/हे.) ---- 100 ते 110 ---- 125 ते 140 ---- 140 ते 160 ---- उत्पादनात वाढ - 30 टक्के ते 35 टक्के 
पाणीवापर क्षमता (टन/हे. सें.मी.) ---- 0.35 ते 0.40 ---- 0.80 ते 1.0 ---- 1.0 ते 1.20 ---- सरी- वरंबा पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचनाची पाणीवापर क्षमता 2.25 ते 2.50 पट जास्त 
पाणी देण्याची कार्यक्षमता (टक्के) ---- 60-70 ---- 90-95 ----95 ते 97 ---- पाणी देण्याच्या कार्यक्षमतेत 30 टक्के वाढ 
रासायनिक खतमात्रा (सुरू) (कि./हे.) ---- 250ः115ः115 ---- 175ः80ः80 ---- 175ः80ः80 ---- खतमात्रेत 30 टक्के बचत 
योग्य लागवड पद्धत ---- लांब सरी/ पट्टा पद्धत ---- जोड ओळ पट्टा पद्धत व 1.5 ते 2.10 मी. अंतरावरील सरी पद्धत ---- जोड ओळ पट्टा पद्धत व 1.5 ते 2.10 मी. अंतरावरील सरी पद्धत ---- मध्यम जमिनीसाठी जोड ओळ पद्धतीत 0.45-1.5 मी. अंतर जास्त खोलीच्या व भारी जमिनीसाठी 0.60-1.8 मी. अंतर. जास्त अंतरावरील सरी पद्धतीसाठी 1.5 ते 2.10 मी. अंतर

ऊस क्षेत्रामध्ये कृती कार्यक्रमाची गरज

  • ठिबक सिंचनाबरोबर लागण व खोडवा पिकात पाचट आच्छादन करावे. पाचट कुजण्यासाठी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचट कुजविणारे जीवाणू यांची प्रक्रिया करावी. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील व सेंद्रिय खत उपलब्धतेमुळे ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल.
  • खोडवा पिकामध्ये बुंध्याची जमिनीलगत छाटणी करून नांग्या भरून घ्याव्यात. त्याचप्रमाणे उसास द्रवरूप खतांची फवारणी करावी.
  • कारखान्यांनी कृषी आणि ऊस विकास विभागामार्फत कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक सिंचन व पाचट आच्छादनासहित खोडवा व्यवस्थापनासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातूनच 2015-16 गळीत हंगामासाठी ऊस उपलब्धता होऊ शकेल.

No comments:

Post a Comment

मिश्र खते

*   मिश्र  खते *   १ ) १८ : ४६  : ००   कांदा पिक   डोस = १००     :     ५०    :     ५०                     नत्र              स्फुरद...