Thursday, June 14, 2018

कलम करणे

कलमाचे प्रकार

कृती

छाट कलम

  • यासाठी माती-शेणखत हे ३:१ या प्रमाणात मिसळून प्लॅस्टिक पिशवीत भरून त्यावर पाणी शिंपडतात.
  • ज्याचे कलम करायचे आहे त्या झाडाचे तिरकस छाटे कापतात.
  • छाट्याला खालील बाजूस, तिरकस बाजूस संजीवक लावतात.
  • संजीवक लावलेला भाग पाणी शिंपडलेल्या पिशवीत रोवतात..
  • छाट्याच्या बाहेरील बाजूस शेण लावतात किंवा तो जोड लॅस्टिकने बांधतात.
  • पिशवीत कायमचा ओलावा राहील अशा पद्धतीने पाणी सोडतात.

गुट्टी कलम

  • कलमासाठी निवडलेल्या फांदीची साधारण एक ते दीड इंच लांबीची गोलाकार साल काढतात.
  • साल काढलेल्या जागी संजीवक लावतात.
  • नंतर ओले केलेले स्पॅग्नॉमॉस त्यावर लावून प्लॅस्टिकच्या फितीने तो भाग बंद करतात. स्पॅग्नॉमॉस ओले करून लावतात कारण कलम तयार होताना त्यास पाण्याची आवश्यकता असते व ते पाण्याला स्पॅग्नॉमॉसमधून शोषून घेते. स्पॅग्नॉमॉसमधील पाणी ज्यावेळी संपते त्यावेळी स्पॅग्नॉमॉस हवेतील आर्द्रता शोषून घेते व कलमाची पाण्याची गरज त्यातून भागविली जाते म्हणून गुट्टी कलम करताना स्पॅग्नॉमॉस वापरतात.

दाब कलम 

  • माती व शेणखत यांचे ३:१ या प्रमाणात मिश्रण करून ते कुंडीत घेतात.
  • पेरूच्या झाडाची जमिनीलगतची फांदी कलमासाठी निवडतात..
  • शेंड्यापासून २ फूट मागील बाजूस फांदीचे खालून १-२ इंच तिरकस कट घेतात.
  • तिरकस काप घेतलेल्या ठिकाणी नारळाची कडी घालतात व त्यास संजीवक लावून तो भाग कुंडीमधील मातीत दाबून टाकतात.
  • दाबलेल्या भागावर वजन ठेवतात.
  • कुंडीत पाणी सोडतात.
विशेष माहिती : कलम करण्याचे निरनिराळे प्रकार
अ.क्रअभिवृद्धीचा प्रकारकोणत्या वेळी केल्यास चांगलेकोणती झाडे
छाट कलमखरीप अगर रब्बी हंगामातअंजीर, द्राक्षे, शेवंती, बहुवार्षिक झाडे, वेळी (जाई-जुई )
दाब कलमपावसाळातगर, कागदी लिंबू, पेरू, वेली वैगेरे
गुट्टी कलमपावसाळाड्रेसिना, क्रोटेन, मुसाडा एक्झोटा डाळिंब
पाचार कलमऑक्टोंबर नोव्हेंबरआंबा व इतर कोणतेही फळझाड
डोळा भरणेनोव्हेंबर ते फेब्रुवारीगुलाब,संत्री,मोसंबी इ.

पाचर कलम
  • एक ते दीड वर्षाच्या गावरान आंब्याच्या शेंड्याकडील भाग सी कटरच्या साहाय्याने कापावा.
  • कापलेल्या खोडाला मध्यभागी उभा काप घ्यावा.
  • चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची फांदी सी कटरने कापावी.
  • फांदीची सर्व पाने सी कटरने छाटून टाकावी.
  • फांदीच्या खोडाकडील बाजूला पाचराचा आकार द्यावा.
  • ती पाचर गावरान आंब्याच्या खोडामध्ये बसवावी.
  • पूर्ण जोड प्लॅस्टिकच्या फितीने बांधून टाकावा.
डोळा भरणे
  • कलमासाठी निवडलेला डोळा फांदीपासून वागला करण्यासाठी चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडेने वर्तुळ पाकळीच्या आकाराचा काप घ्यावा
  • फुटव्याला इजा न होता डोळा फांदीपासून वेगळा करावा.
  • पाचर कलमाच्या ज्या फांदीवर तो डोळा बसवायचा आहे त्यावर इंग्रजी आय किंवा टी आकाराचा काप घ्यावा.
  • कापाच्या मध्यभागी साल चाकूच्या साहाय्याने उचकटून काढलेला डोळा त्यामध्ये बसवावा.
  • डोळ्यातील फुटवा उघडा ठेवून कलमावर प्लॅस्टिकची फीत ताणून बांधावी.
द्क्षता
  • कलमाचे काम करताना सी कटरने / चाकूने शरीराला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • छाट / पाचार कलमांसाठी फांदी निवडताना कोवळी अथवा फार जुनी फांदी निवडू नका.
  • पाचार कलमाच्या त्या फांदीवरती किमान चार डोळे आहेत याची खात्री करा.
  • गुटी कलमाला मूल्य फुटल्यावर ती गुटी मूळ झाडापासून वेगळी करा.
  • पाचार कलम केल्यानंतर मूळ झाडास नवीन फुट आल्यास ती काढून टाका.
  • डोळा भरणे कलम केल्यानंतर मूळ झाडास नवीन फुट आल्यास ती काढून टाका.
  • कलमांसाठीच्या फांद्यावरती कोणत्याही प्रकारची कीड नसावी.









No comments:

Post a Comment

मिश्र खते

*   मिश्र  खते *   १ ) १८ : ४६  : ००   कांदा पिक   डोस = १००     :     ५०    :     ५०                     नत्र              स्फुरद...