Thursday, June 14, 2018

नॅपसॅक पंप


कृती
  • सुरुवातीस स्पॅनरच्या साहाय्याने पंपाचे भाग वेगळे करा.
  • सर्व भागांची नावे व उपयोग समजून घ्या.
  • पंप पुन्हा व्यवस्थित जोडा.
  • त्यामध्ये पाणी ओतून पंप पाठीवर घेऊन फवारा, कसा तयार होतो ते पहा.
  • नंतर नुसत्या पाण्याचीच जमिनीवर फवारणी करा.
माहिती : नॅपसॅक पंपामध्ये (औषध भरण्याच्या टाकी मध्ये) हवेचा दाब दटटयाच्या साहाय्याने वाढवून औषध नळीद्वारे नोझालमधून फवारले जाते.
द्रावण बनविणे व फवारणी :
बाजारात जास्त द्रावण फवारणे, कमी द्रावण फवारणे, अत्यल्प द्रावण फवारणारे फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या फवारणीमध्ये हेक्टरी किटकनाशकाची क्रियाशील घटकांची मात्रा एक सारखीच असते, फक्त पाण्याचे प्रमाण कमी जास्त करण्याने वेगवेगळ्या साधनांची निवड करावी लागते.
कीडनाशकाचे द्रावण तयार करण्याची पद्धत
कीडनाशकांच्या डब्यावर क्रियाशील घटकांचे प्रमाण दिलेले असते. द्रावणाची तीव्रता- औषधाबरोबर मिळणाऱ्या पुस्तिकेमध्ये असते. लागणारे औषधे = लागणारे द्रावण*द्रावणाची तीव्रता/क्रियाशील घटकांचे प्रमाण लागणारे औषधे = लागणारे द्रावण * द्रावणाची तीव्रता / क्रियाशील घटकांचे प्रमाण
क्रियाशील घटकाचे प्रमाण -
९/९ ग्रॅम प्रति लीटर लागणारे द्रावण काढण्यास पिकात काही ठराविक भागात पाण्याची फवारणी करावी. त्यावरून हेक्टरी द्रावण काढावे. किंवा-
१ हेक्टर - २.५ एकर = हेक्टरी ५०० लीटर
१ एकर - ४० गुंठे = एकरी २०० लीटर
१ गुंठा - १०० मीटर स्के = प्रति गुंठा लीटर
पिकावरून झिरपून खाली न पडता जेवढे जाईल तेवढे फवारावे.
तसेच पंपाची क्षमता व चालण्याचा वेग याही गोष्टी लक्षात घ्यावात.





पंपाचे विविध भागस्वरूप (प्रकार)भागाचा उपयोग
नाॅॅझलपितळी/प्लॅॅस्टिकफवारा तयार करणे.
ट्रीगरपितळी/प्लॅॅस्टिकप्रवाह चालू बंद करणे.
रबरी नळीप्लॅॅस्टिकद्रावणाचे साठवण करणे.
स्कर्टलोखंडी पत्राटाकी बसवण्यासाठी.
टाकीप्लॅॅस्टिकद्रावण साठवणे.
गाळणीप्लॅॅस्टिकद्रावण गाळणे.
हँँडललोखंडीअॅक्सलला गती देणे.
कनेक्टिंग रॉडलोखंडीअॅक्सल व पिस्टन यांना जोडणे.
अॅक्सललोखंडीपिस्टनला गती देणे.
पिस्टनपितळीटाकीतील द्रावण स्वतःमध्ये साठवणे.
बॉलपितळीद्रावणास एकाच दिशेत जाऊ देणे.
वॉशररबरटाकीतील द्रावण पिस्टनमध्ये ढकलणे.



दक्षता
  • पंप खोलताना स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • नॉझल, पिस्टन इ. खोलताना व जोडताना जास्त बलाचा वापर करू नका.
  • पिस्टन उघडल्यानंतर त्यातील पितळी बॉल हरवणार नाही याची काळजी घ्या.
  • पिस्टनला लावलेला रबरी वॉशर काढताना तो फाटणार नाही याची काळजी घ्या.
  • हँडल खाली- वर करताना जास्त ताकद लावू नका.                                                                                                                                      
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
  • फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये.
  • पंपात हवेचा दाब योग्य तयार होऊन फवारणी चांगली होत आहेना, याची खात्री करून घ्यावी.
  • पिकांची उंची व हवेचा झोत लक्षात घेणे, नोझल वाटे पडणाऱ्या द्रावणाची फेक व रुंदी पहावी.
  • पंपाचे वॉशर्स- नोझल स्क्रू खाली मातीत पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • नोझल मध्येच बंद झाल्यावर तारेने साफ करावा- तोंडाने साफ करू नये.
  • गळक्या पंपाचा वापर करू नये.
फवारणी झाल्यावर घ्यावयाची काळजी
  • रोजचे काम झाल्यावर पंप साफ करावा.
  • धुवून झाल्यावर पंपाने थोडा वेळ निव्वळ पाणी फवारावे.
  • टाकी धुतल्यावर उघडी करून कोरडी होईल अशी ठेवावी.
  • पंपाचे नोझल व गाळण्या रॉकेलने धुवून घ्यावेत.
  • काम झाल्यावर पेट्रोल पंपातून काढून ठेवावे.
  • वंगणाची गरज असलेल्या भागांना वंगण करावे.
  • फवारणी पंप शक्यतो उष्णतेपासून, धुळीपासून दूर ठेवावेत.
व्यक्तीने स्वतःची घ्यावायची काळजी
  • फवारणी औषध बनवताना हातात रबरी ग्लोव्हज घालून बनवावे.
  • फवारणी करताना तोंड, नाक, हात हे सर्व भाग झाकलेले (कपड्याने) असावेत.
  • फवारणी झाल्यावर हात-पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • फवारणी चालू असताना तंबाखू वा इतर कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.
  • औषध डबे जमिनीत गाडून ठेवावेत
  • फवारणीत क्षेत्रात फुले,फळे,हुंगु नये किंवा खाऊ नयेत.


No comments:

Post a Comment

मिश्र खते

*   मिश्र  खते *   १ ) १८ : ४६  : ००   कांदा पिक   डोस = १००     :     ५०    :     ५०                     नत्र              स्फुरद...