प्रकल्प अहवाल
सन:-२०१७-१८
विज्ञान आश्रम पाबळ
ता.शिरूर जि.पुणे
Ø विभागाचे नाव :- शेती व पशुपालन
Ø प्रकल्पाचे नाव :- पालापाचोळा पासून कंपोस्ट खत बनवणे
Ø प्रकल्प कर्णधारचे नाव :- सनातन भास्कर वायकर
Ø मार्गदर्शक :- रणजीत सर,ओंकार सर
अनुक्रमणिका
|
|
१)
|
प्रस्तावना
|
२)
|
उद्देश
|
३)
|
नियोजन
|
४)
|
साहित्य
|
५)
|
साधने
|
६)
|
फोटो
|
७)
|
कृती
|
८)
|
नोंदी
|
९)
|
प्रत्यक्ष खर्च
|
१०)
११) १२) |
अनुभव
अडचणी निरीक्षण |
प्रस्तावना :-
कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो. भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले. वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात.
उददेश :-
पालापाचोळा पासून कंपोस्ट खत तयार करणे .
नियोजन :-
१) या प्रकल्पाची निवड सरांशी चर्चा करून ठरवली 2) प्रकल्पाला लागणाऱ्या सामनाची यादी तयार केली
साहित्य :-
झाडाचा पाला , जलपर्णी किंंवा कर्दळ अॅझोला,कंपोस्ट खत .
साधने :- विळा ,कोयता ,वजन काटा
फोटो :-
कृती :-
१) पाला गोळा केला १ किलो
२) ४ किलो जलपर्णी आणली
३) ८ किलो अॅझोला
४) हे सर्व मिक्स केले व कुट्टीकेली त्यात कंपोस्ट खत मिक्स केले .
५) वडाच्या झाडाखाली एक बेड तयार केला
नोंदी :-
१) १०/५/२०१८ ला पाला,अॅझोला,कंपोस्ट ,जलपर्णी आणून कुट्टी केली बेड तयार केला .
२) १४/५/२०१८ ला कंपोस्ट ला ३ लिटर पाणी घातले
३) १५/५/२०१८ ते 23/५/२०१८ पर्यंत रोज ३ लिटर पाणी मारले
४) २४/५/२०१८ ला कंपोस्ट बेड तयार केला त्यात अर्धे कंपोस्ट नवीन बेड मध्ये टाकले
५) ३०/५/२०१८ ला ८ किलो कर्दळ कापली ४ किलो पाला हे सर्व कुट्टी करून एका बेड मध्ये ४ किलो टाकले व दुसऱ्या कंपोस्ट बेड मध्ये ४ किलो टाकले १ लिटर पाणी मारले .
६)१३/६/२०१८ ला ४ किलो कर्दळ व १ किलो पाला आणला त्यानंतर कुट्टी करून घेतली व कंपोस्ट बेड मध्ये टाकून थोडे कंपोस्ट मिक्स केले .
अनुभव :-
१) कंपोस्ट खत कसे तयार होते हे बघितले.
२) खताचा कशा प्रकारे वापर करू शकतो हे कळाले.
अडचणी :-
१) कर्दळ कुट्टी मध्ये अडकत होती
२) पाला त्यात बारीक होत नव्हता .
निरीक्षण :-
१०) रोज पाणी घालताना निरीक्षण केले त्याचा कलर काळा होत गेला हे बघितले .
दक्षता :-
१)कुट्टी करताना आपला हात जाणार नाही याची काळजी घ्यावी .
२)कर्दळ कापताना आपला हात कापला नाही याची काळजी घ्याावी.
खर्च :-
वस्तूचे नाव
|
किंमत
|
अॅझोला
|
८० रुपये
|
लाईट
|
२० रुपये
|


No comments:
Post a Comment